महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फोनवर मोठ्याने का बोलतोस म्हणून विचारणे पडले महागात; क्षुल्लक कारणावरून खुनाची घटना - लातूर मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास विरोध केल्याच्या कारणावरून खून

मोबाईल जेवढा आवश्यक तेवढाच तो त्रासदायकही ठरत असल्याची काही उदाहरणे आहेत. एखादा व्यक्ती फोनवर मोठ्या आवाजात बोलत असेल तर सहज लहान आवाजात बोलण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हाच सल्ला एकाच्या जीवावर बेतला आहे.

latur murder case
latur murder case

By

Published : Feb 20, 2021, 5:41 PM IST

लातूर- मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास विरोध केल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील बामणी येथे एकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

निलंगा तालुक्यातील बामणी गावात जगन्नाथ किशन शिंदे यांच्या घरासमोर काहीजण मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलत होते. रस्त्यावर फोनवर बोलणाऱ्यांचा त्रास हा शिंदे यांच्यासाठी नित्याचाच झाला होता. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास काही तरुण जगन्नाथ शिंदे यांच्या घरासमोर आले व आम्हाला फोनवर मोठ्याने बोलण्यास का विरोध करीत होतास, म्हणून काठी आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दहाजणांनी मारहाण केल्याने यामध्ये जगन्नाथ शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. जगन्नाथ शिंदे यांचे घर ऐन रस्त्यावर असल्याने मोठ्याने बोलणाऱ्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागत होता. यामुळे ते समजूत काढण्यासाठी गेले होते, पण दहाजणांनी मारहाण केल्याने ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी मयत जगन्नाथ शिंदे यांची बहीण सुनीता अर्जुन रणदिवे यांच्या तक्रारीवरून निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून बापू ढाले, हणमंत गायकवाड, राम गायकवाड, गोरख गायकवाड, अरविंद गायकवाड, शशिकांत गायकवाड, मल्हारी गायकवाड, दिगंबर गायकवाड, शंभो गायकवाड, शाम गायकवाड यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल चोरमले हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details