लातूर - राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट आहे. याचा परिणाम लातूर जिल्ह्यातही दिसून येत असून अहमदपूर तालुक्यातील किनगाव कोपरा तलावात म्हशीला पाणी पाजण्यास घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याचा मंगळवारी उष्माघाताने मृत्यू झाला. वाढत्या उन्हामुळे ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही बाब निदर्शनास आली.
वाढत्या उन्हाचा झटका : लातूरच्या किनगावात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
लातुरसह राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. अहमदपूर तालुक्यातील शिवाजी शेळके या इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
शिवाजी बंडप्पा शेळके (वय ६८) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ते म्हशींना पाणी पाजण्यासाठी कोपरा तलावावर गेले होते. या दरम्यान शेळके यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या तोंडाला फेस आला होता. ही बाब लवकर लक्षात आली नाही. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत घराकडे न परतल्याने कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. रात्री ९ च्या दरम्यान त्यांचा मृतदेह या तलावाजवळ आढळून आला. या घटनेची तक्रार बालाजी संगप्पा यांनी दिली.