लातूर -बांधकामाचे साहित्य इमारतीवर घेऊन येणाऱ्या मित्राचा पाय सळ्यामध्ये अडकल्यामुळे तो इमारतीवरून खाली कोसळणार हे पाहून दुसऱ्या मित्राने त्याला वाचवले. मात्र, तो स्वतःला सावरू न शकल्यामुळे इमारतीवरुन खाली पडला आणि यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे घडली. दिपक धोंडिबा उमाचे, असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लातुरात मित्राचे प्राण वाचविले पण 'त्याने' स्व:ताचा जीव गमवला - Latur Government Polytechnic College
दिपक आणि त्याचा सहकारी योगेश पुल्लेवाड हे बांधकामासाठी इमारतीवर गेले होते. दरम्यान, सळ्या घेऊन येत असताना योगेशचा पाय अडकला आणि त्याचा तोल गेला. तो इमारतीवरुन कोसळणार तेवढ्यात दिपकने त्याला सावरले. मात्र, तो स्वतःला सावरू शकला नाही आणि यात त्याचा मृत्यू झाला.

दिपक (रा. मुळचा कर्नाटकातील बोंथी) कामानिमित्ताने सासुरवाडीत (ममदापूर ता. लातूर) राहत होता. गेल्या महिन्याभरापासून दिपक आणि इतर ३० कामगार शिवाजी चौकातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करत होते. आज नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण करुन दिपक आणि त्याचा सहकारी योगेश पुल्लेवाड हे बांधकामासाठी इमारतीवर गेले होते. दरम्यान, सळ्या घेऊन येत असताना योगेशचा पाय अडकला आणि त्याचा तोल गेला. तो इमारतीवरुन कोसळणार तेवढ्यात दिपकने त्याला सावरले. मात्र, तो स्व:ताला सावरू शकला नाही. तो इमारतीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर याच दवाखान्यात जखमी योगेशवर उपचार सुरू आहेत.
दिपक उमाचे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दिपकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. याचे कंत्राट साईबाबा कन्स्ट्रशनला देण्यात आले आहे, अशी माहिती समोर येत आहे.