लातूर -आर्थिक व्यवहारातून झालेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील हैबतपूरमध्ये घडली आहे. शफी अहमद सय्यद (वय 32) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीमुळे उदगीर शहरात तणावाचे वातावर निर्माण झाले आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून, वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू, उदगीरमध्ये दगडफेक - Latur District Crime News
आर्थिक व्यवहारातून झालेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील हैबतपूरमध्ये घडली आहे. शफी अहमद सय्यद (वय 32) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीमुळे उदगीर शहरात तणावाचे वातावर निर्माण झाले आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून, वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संतप्त नातेवाईकांकडून दगडफेक
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील हैबतपूरमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून दोघांचे टोकाचे भांडण झाले, भांडणात झालेल्या मारहाणीमध्ये शफी अहमद सय्यद हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका शफी सय्यद यांच्या नातेवाईकांनी घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र तोपर्यंत संतप्त नातेवाईकांनी उदगीर शहरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेत रस्त्यावरून जाणारे अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केली असून, शहरात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.