लातूर - घरणी-चाकूर मार्गावरील लातूर रोडजवळ बस आणि कारचा समोरासमोर अपघात झाल्याने कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चाकूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घरणी-चाकूर मार्गावर बस-कारचा अपघात; एकाचा मृत्यू - लातूर'चाकूर
या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चाकूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बस
या भीषण अपघातामध्ये मनोजकुमार कंगळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर धम्मदीप डांगे आणि आशा मोहनाळे हे पंचायत समितीचे कर्मचारी जखमी आहेत.
मनोजकुमार कंगळे हे चाकूर पंचायत समितीमध्ये सहायक लेखाधिकारी होते. शुक्रवारी कार्यालयातून ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत कारमधून (एम.एच.२४ ए. जी.९७९) लातूरकडे मार्गस्थ होत असताना लातूर शहरानजीक समोरून येणाऱ्या बसला (एम.एच.२० बी.आय २७८५) जोराची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.