महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

लातूर-रेणापूर मार्गावरील महापोरजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

लातूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By

Published : Apr 8, 2019, 9:17 PM IST

लातूर- लातूर-रेणापूर मार्गावरील महापोरजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जमावाने ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रदीप गोपाळराव गोडभरले असे मृताचे नाव आहे.

प्रदिप रामवडी (ख) येथून लातूरकडे येत असताना महापोर गावाजवळ पाठिमागून येणाऱ्या (एम. एच.१३ जी.२३९५) ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये प्रदीप गोडभरले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रदीप गोडभरले हे मूळचे रामवाडी येथील रहिवासी असून ते मागील काही वर्षांपासून लातूर येथील मयुरबन येथे राहत होते. सोमवारी सकाळी ते गावाकडील शेताकडे गेले होते. त्यावेळी शेतमाल घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली. ट्रक चालकास रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details