लातूर -लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या ही 700 एवढी आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. शिवाय नौकारीमध्ये जाचक अटी लादल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविरोधात शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक संप केला.
या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या -
इतर विभागातील सरकारी वर्ग 4 परिचरप्रमाणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळावेत, वर्ग 4 वरून 3 मध्ये पदोन्नती देण्याबाबत ग्रामविकास विभागाचे सुधारित सेवा प्रवेश नियम तत्काळ निर्गमित करावेत, चतुर्थ श्रेणीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यास विना अट सेवेत घ्यावे, सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित केलेले मूळ वेतन 15000 ऐवजी केंद्राप्रमाणे 18 हजार करण्यात यावे, पंचायत समिती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी चौकीदार पदे निर्माण करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी -