महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत - Latur district news

चॉकलेटचे आमिष दाखवत सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तीर्थ धानोरा येथे घडली आहे. याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

ahmedpur police station
अहमदपूर पोलीस ठाणे

By

Published : Mar 20, 2021, 7:12 PM IST

Updated : Mar 20, 2021, 7:57 PM IST

लातूर-घरात खेळत असलेल्या अल्पवयीन चिमुरडीला 10 रुपये देऊन चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार अहमदपूर तालुक्यातील तीर्थ धानोरा येथे घडली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लातूर जिल्ह्यात या आठवड्यात दोन अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. 7 मार्चला पीडित चिमुरडी ही आपल्या घरात खेळत होती. दरम्यान, अतुल बाबुराव कवडे (वय 37 वर्षे) याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर नेत अमानुष अत्याचार केला. एवढेच नाही तर याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 7 मार्चला घडली असून 20 मार्चला अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी बाललैंगिक अपराधनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Mar 20, 2021, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details