लातूर- जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव परप्रांतीय नागरिकांकडून झाला. आसाम येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून आंध्रप्रदेशातील करनुळकडे निघालेल्या 12 नागरिकांना निलंग्यात क्वारंटाईन करण्यात आले होते. पैकी 8 जणांना 4 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णांची संख्या सतत वाढत असून गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 66 वर गेला आहे.
लातूर कोरोना अपडेट: जिल्ह्यात एकूण 66 कोरोनाबाधित, 28 जणांवर उपचार सुरू - corona patient latur
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६६ झाली आहे. त्यापैकी ३६ जण बरे झाले असून २८ जणांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनावर अंकुश घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. मात्र, परजिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील संख्या ही वाढतच गेली आहे. निलंग्यातील 8 कोरोना रुग्ण बरे झाल्यांनातर उदगीर येथे एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आणि यामध्येच महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उदगीर शहरासह लातूर, चाकूर, जळकोट, अहमदपूर, निलंगा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आजपर्यंत 66 नागरिक कोरोनाबाधित झाले असून यामध्ये 38 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश होता. तर एक महिला आणि एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या 28 रुग्णांवर उदगीर आणि लातुरात उपचार सुरू आहेत. 36 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पुणे- मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 30 हजारहून नागरिक परजिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या उदगीर शहरातील चार ठिकाणे ही कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा पुरवली जात आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून गरजेनुसार नियमात बदल केले जात आहेत.