महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ एनएसयूआयचे निदर्शन - \ एनएसयूआय

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने पदवी परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून विद्यापीठाने निर्णय मागे घ्यावेत, या मागणीसाठी एनएसयूआयने बुधवारी दयानंद महाविद्यालयासमोर निदर्शन केले.

स्वामी रामानंद तीर्थ विदयापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ एनएसयूआयचे निदर्शन

By

Published : Jul 24, 2019, 6:57 PM IST

लातूर - स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने पदवी परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून विद्यापीठाने निर्णय मागे घ्यावेत या मागणीसाठी एनएसयूआयने बुधवारी दयानंद महाविद्यालयासमोर निदर्शन केले.

स्वामी रामानंद तीर्थ विदयापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ एनएसयूआयचे निदर्शन

विदयापीठाकडून बीए, बीकॉम, बीसीए, बीएस्सी, बीसीएस इ. अभ्यासक्रमांच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. पुर्वी ऐच्छिक पेपरसाठी चार तास वेळ दिला जायचा. विद्यापरीषदेच्या नविन नियमानुसार यावर्षी केवळ तीन तास वेळ दिल्याने विद्यार्थ्यांनध्ये संभ्रम निर्माण झाला. याशिवाय ऐच्छिक विषयाचे दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा दबाव आला आहे. हरीक्षेची बहुपर्यायी पद्धतदेखील अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून कुलगुरुंनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

यावर तोडगा न काढल्यास जिल्हाभर हिंसक आंदोलन करणार असल्याचे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष रोहीत पाटील, ईम्रान सय्यद रामराजे काळे, सूरज पाटिल प्रविण भावाळ, शुभम जाधव, अभिषेक कल्लोरे, गजानन मोरे, रोहन शेळके, बाळासाहेब करमुडे, सारग मेटे, गणेश दंडगुले, शुभम स्वामी, कृष्णा भोपळे, वैभव कातळे, सिद्धेश्वर साळुंके आदी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थीत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details