महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2020, 1:42 AM IST

ETV Bharat / state

आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकाच्या निगराणीत

शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नचे वेगळे महत्व आहे. असे असतानाही प्रात्यक्षिक परीक्षेकडे कायम दुर्लक्षच झाले आहे. या परीक्षेचे गुण हे ग्राह्यच धरले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने लातूर बोर्डाने यंदा होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयाचे धाबे दणाणले आहेत.

Latur practical Examination
आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकाच्या निगराणीत

लातूर- शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नचे वेगळे महत्व आहे. असे असतानाही प्रात्यक्षिक परीक्षेकडे कायम दुर्लक्षच झाले आहे. या परीक्षेचे गुण हे ग्राह्यच धरले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने लातूर बोर्डाने यंदा होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयाचे धाबे दणाणले आहेत.

आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकाच्या निगराणीत

प्रॅक्टिकल परीक्षांना दुय्यम महत्व दिले जाते. काही शाळांमध्ये तर प्रयोगशाळाही नाहीत. ही परीक्षा कागदोपत्रावर आटोपून विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे मात्र, विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकच या प्रॅक्टिकल गुण देतात. हीच बाब लातूर बोर्डाच्या निदर्शनास आल्यामुळे यंदापासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरील परीक्षकासोबतच भरारी पथकाचीही करडी नजर या परीक्षांवर राहणार आहे. १७ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ विच्या प्रॅक्टिकल परीक्षा होत आहेत. या परीक्षांदरम्यान ही भरारी पथके नेमण्यात येणार असल्याचे पात्र बोर्डाचे सचिव यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेबरोबरच प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे बाह्य परीक्षकाला हाताशी धरून पार पाडली जाणारी प्रॅक्टिकल परीक्षा आता भरारी पथकाच्या निगराणीत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details