लातूर : उदगीर पाठोपाठ लातूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लेबर कॉलनी, एमआयडीसी भागात रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी मोती नगर येथील एकाच कुटुंबातील 9 जणांना तर देसाई नगर येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 10 नव्या रुग्णांची भर पडली असून हे सर्व लातूर शहरातील आहेत.
एकीकडे जिल्हा प्रशासन नव्या रुग्णांची भर पडू नये म्हणून विविध उपाययोजना राबवत आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी देखील रुग्णांमध्ये वाढ होऊ नये, यासंदर्भात बैठक घेतली होती. मात्र, जिल्ह्यात आणि लातूर शहरात रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातून 50 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी दाखल झाले होते. पैकी 38 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह असून 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचे अनिर्णित आहेत.