निलंगा (लातूर) - निलंगा शहरातील आकाश बालाजी सावरे (वय २८ वर्षे) या तरूणाचा खून करून लातूर-जहिराबाद हायवे लगतच्या केळगाव येथील एका विहिरीत टाकल्याचा संशय कुटुंबीयानी व्यक्त केला आहे. या तरूणाचा गुढ मृत्यू झाल्याची चर्चा असून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याची चर्चा परिसरात आहे.
याबाबत निलंगा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गेल्या दोन दिवसापासून निलंगा शहरातील निलंगा-बिदर रोड लगत घर असलेला आकाश बालाजी सावरे हा अविवाहित तरूण गेल्या दोन दिवसापासून गायब होता. याची तक्रार त्याचा मोठा भाऊ सुरज बालाजी सावरे यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरूणाच्या मृतदेहावर उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिनांक १६ ला रात्री ८.३० वाजता देण्यात आला.
निलंग्यात तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? - nilanga latest news
निलंग्यातील तरुणाची आत्महत्या नसून खून झाला असल्याची चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे. दोन दिवसानंतर लातूर जहिराबाद हायवे लगत असलेल्या दहा किलोमीटर अंतरावर केळगाव शिवारात सत्तार पटेल यांच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खून झाल्याचा संशय वाढला आहे. याबाबत निलंगा पोलिसांनी पंचनामा करून खिशातील काही ओळखीच्या वस्तू वरुन ओळख पटवून संबंधित मयत तरुणाच्या भावाला कळविले.
या तरुणाची आत्महत्या नसून खून झाला असल्याची चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे. दोन दिवसानंतर लातूर जहिराबाद हायवे लगत असलेल्या दहा किलोमीटर अंतरावर केळगाव शिवारात सत्तार पटेल यांच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खून झाल्याचा संशय वाढला आहे. याबाबत निलंगा पोलिसांनी पंचनामा करून खिशातील काही ओळखीच्या वस्तू वरुन ओळख पटवून संबंधित मयत तरुणाच्या भावाला कळविले. आकाश सावरे याचा मृतदेह असल्याचे समजताच पंचनामा केला. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंतिम संस्कारासाठी नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-भाऊ असा परिवार असून पुढील तपास अनिल चोरमले हे करत आहेत.