महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याच्या शोधात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नागरिकांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन - ठिय्या आंदोलन

नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा निषेध करत नागरिकांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने आंदोलकांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला.

मृत वृद्ध आणि आंदोलक

By

Published : May 14, 2019, 10:01 PM IST

Updated : May 14, 2019, 11:29 PM IST

लातूर- निलंगा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातूनच रविवारी एका वृद्धाचा पाण्याच्या शोधात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा निषेध करत नागरिकांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने आंदोलकांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला.

निलंग्यातील ग्रामस्थांचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन

पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या शहरातच पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. रविवारी भर उन्हात पाण्याच्या शोधात असलेल्या महेबूब पाशा अब्दुल करीम सौदागर या ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. नगरपालिकेने वेळीच खबरदारी घेतली असती तर ही दुर्घटना घडली नसती. यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.

यादरम्यान, मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने संतप्त नागरिकांना त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून रोष व्यक्त केला. निलंगा शहरातील फुलारी गल्लीमध्ये नगरपरिषदेचे बोअर गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने महेबूबपाशा अब्दुल करीम सौदागर हे पाणी आणण्यासाठी सार्वजनिक बोअरवर गेले होते. पाणी घेऊन येताना त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

Last Updated : May 14, 2019, 11:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details