निलंगा(लातूर)-नवीन दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा माझ्या घरात राहू नको, असा तगादा सासरच्या व्यक्तींनी लावल्याने नवविवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीवाडी येथील नवविवाहित रेश्मा कुमार मंडले (वय १९ वर्षे) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
शिरसीवाडी येथील कुमार शिवाजी मंडले, शिवाजी हणमंत मंडले, वायम्मा शिवाजी मंडले, लक्ष्मीबाई उमेश मंडले, सकूबाई अंकुश मंडले सर्व राहणार शिरसीवाडी यांनी नवीन दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा घरात राहू नको, अशा प्रकारे रेश्मा हिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. मानसिक त्रास देणे आणि उपाशीपोटी ठेवणे याद्वारेआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यासर्वांविरोधात कासार शिरसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.