लातूर - जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी प्रलंबित आणि नव्याने तपासणी झालेल्या नमुन्यांपैकी 115 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांचा धोका कायम असून, दिवसभरात 28 जणांवर उपचार करून डिस्चार्जही देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असतानाही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.
लातूर जिल्ह्यात 115 कोरोना रुग्णांची वाढ; 28 जणांची कोरोनावर मात - लातूर कोरोना अपडेट
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 525 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 485 जणांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या प्रलंबित अहवालांपैकी 70 व्यक्तींचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 525 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 485 जणांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या प्रलंबित अहवालांपैकी 70 व्यक्तींचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी 440 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी 45 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, सर्वाधिक रुग्ण लातूर शहरातील आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे.
आतापर्यंत लातूर तालुक्यात 512, उदगीर 217, निलंगा 132, औसा 102, देवणी 29, चाकूर 22, अहमदपूर 78, शिरुरांनातपाळ 01,जळकोट 4 तर रेणापूर तालुक्यात 9 असे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे उपचार घेऊन परतणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 15 दिवसांचे लॉकडाऊन सुरू आहे. आता याचा परिणाम काय होईल ते काही दिवसातच समोर येईल.