लातूर -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी 38 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर एका रुग्णाचा उदगीरमध्ये मृत्यू झाला आहे. एकीकडे अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या बैठकावर बैठका सुरू आहेत मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. 6 जुलै अखेर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 211, उपचाराने बरे झाले रुग्णांची संख्या 270, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 25 व आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 499 इतकी आहे.
कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक ना अनेक उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. परंतु, कोरोनाबधितांचा आकडा हा वाढतच आहे. सोमवारी लातुरात 16, निलंगा येथे 17, अहमदपूर, औसा येथे प्रत्येकी 2 तर शिरूर अनंतपाळ येथे एका रुग्णाची भर पडली आहे. प्रलंबित अहवालपैकी निलंगा येथे तब्बल 16 रुग्ण पॉझिटिव्ह आले असल्याने 1 वर असलेली कोरोना बाधितांची संख्या थेट 17 वर गेली आहे. एका दिवसात सर्वोच्च वाढ ही सोमवारी झाली आहे.