लातूर - गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना मंगळवारी लातूर शहरासह औसा, चाकूर उदगीर तालुक्यात रुग्णांची भर पडली आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३७ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. पैकी ८ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल अनिर्णीत आहे. तर ७ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे.
लातुरात ८ नवे कोरोना रुग्ण; तर ७ जणांना डिस्चार्ज - लातूर जिल्हा बातमी
लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होत आहे. मंगळवारी नव्या रुग्णांचा आकडा हा आठवर गेला आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होत आहे. मंगळवारी नव्या रुग्णांचा आकडा हा आठवर गेला आहे. यामध्ये लातूर शहरात ४ रुग्ण, तर लातुक्यातील भिसे वाघोलीत १, औसा तालुक्यातील अंधोरी १, चाकूर तालुक्यातील १ तर उदगीर शहरातील सराफ लाईनमध्ये १ कोरोना रुग्ण आढळून आला आहे. वाढत्या रुग्णामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर लातूरकरांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
नव्याने आढळून आलेले ४ रुग्ण हे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत. तर इतर ४ रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. लातूर शहरातील टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर तर खाडगाव रोड येथे हे रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असली तरी मंगळवारी ७ रुग्ण हे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.