लातूर-जिल्ह्यात दिवसाकाठी जिल्ह्यात 250 रुग्ण आढळून येत असल्याने रात्रीची संचारबंदी तर लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय पुणे, मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही जागोजागी केली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 242 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, धोका हा कायम होता. त्याचीच अनुभूती जिल्ह्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पुन्हा रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. प्रशासन स्थरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी दिवसाकाठी वाढत असलेले रुग्ण ही चिंतेची बाब आहे. गतआठवड्यात संख्या वाढत असातना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. तर दिवसाला 250 रुग्ण आढळून येऊ लागल्याने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा-नाशकात कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळल्याची पालकमंत्री भुजबळांची माहिती