महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीच्या वादातून चुलत्यास दगडाने मारहाण; आरोपी फरार - live

देविदास नवटके व त्यांचे कुटूंबीय उदरनिर्वाहसाठी लातूर बोधेनगर येथील कपड्याच्या मिलमध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, देविदास यांचा पुतण्या हा चाकूर तालुक्यातील पिंपळनेर येथील शिवारात असलेली शेतजमीन नावावर करून देण्यावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. शेतजमिनीचा हा वाद शुक्रवारी दुपारी टोकाला पोहचला आणि घरीच पुतण्या चंद्रकांत नवटके (वय २१) यांनी चुलता देविदास नवटके यांना दगडाने मारहाण केली.

लातूर

By

Published : Mar 9, 2019, 10:05 AM IST

लातूर - शेती नावावर करून देण्यावरून पुतण्याकडून चुलत्यास दगडाने बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत चुलते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आरोपी अद्यापही फरार आहे.

लातूर

देविदास नवटके व त्यांचे कुटूंबीय उदरनिर्वाहसाठी लातूर बोधेनगर येथील कपड्याच्या मिलमध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, देविदास यांचा पुतण्या हा चाकूर तालुक्यातील पिंपळनेर येथील शिवारात असलेली शेतजमीन नावावर करून देण्यावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. शेतजमिनीचा हा वाद शुक्रवारी दुपारी टोकाला पोहचला आणि घरीच पुतण्या चंद्रकांत नवटके (वय २१) यांनी चुलता देविदास नवटके यांना दगडाने मारहाण केली.
यामध्ये देविदास हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत देविदास नवटके याच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ याचा अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर चंद्रकांत हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details