महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर जिल्ह्यातील 43 केंद्रावर 'नीट' आयोजित ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी - लातूर लेटेस्ट न्यूज

लातूर जिल्ह्यातील 43 केंद्रावर 17 हजार विद्यार्थी नीट देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नीट परिक्षेबाबत संभ्रम होता. अखेर रविवारी सबंध देशात ही परीक्षा पार पडत आहे.

लातूर
लातूर

By

Published : Sep 13, 2020, 2:55 PM IST

लातूर -कोरोनामुळे लांबलेली नीट यंदा सप्टेंबरमध्ये पार पडत आहे. लातूर जिल्ह्यातील 43 केंद्रावर 17 हजार विद्यार्थी हे परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रावर सुरक्षेतेची विशेष काळजी घेतली जात असून दुपारी 2 वाजता पेपर असून सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात आहे.

लातूर जिल्ह्यातील 43 केंद्रावर 17 हजार विद्यार्थी देताय परिक्षा

गेल्या अनेक दिवसांपासून नीट परिक्षेबाबत संभ्रम होता. अखेर रविवारी सबंध देशात ही परीक्षा पार पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रावर सॅनिटायझर, हँड ग्लोज याची सोय करण्यात आली आहे. शिवाय ऑक्सीमिटरने तपासणी केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे तापमान अधिक आहे. त्यांना स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यानंतर रविवारी लातूर शहरात विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त आणि सर्व सोई-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष पेपरला सुरवात होणार असून विद्यार्थ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details