लातूर -भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. लातूर येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोपही यावेळी शहाराध्यक्ष मकरंद सावे यांनी केला.
'पडळकरांचे मानसिक संतुलन बिघडले, लातूरमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध' - लातूरमध्ये पडळकरांच्या विरोधात आंदोलन
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. लातूर येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
!['पडळकरांचे मानसिक संतुलन बिघडले, लातूरमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध' Ncp agitation against gopichand padalkar in latur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7764631-1016-7764631-1593077093596.jpg)
शरद पवार म्हणजे राज्याला लागलेला कोरोना आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा संबंध राज्यभर निषेध केला जात आहे. लातूर येथेही त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीत पडळकरांचे बारामती मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांची ऐपत नसेल तर त्यांनी लातूरातील डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत त्याचा सर्व खर्च राष्ट्रवादीचापदाधिकारी म्हणून मी करतो असा टोलाही यावेळी मकरंद सावे यांनी लगावला.
दरम्याम, पदाधिकाऱ्यांनी पडळकर विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळल्याला जोडे मारले. शिवाय भाजपच्या नेत्यांच्या पाठबळामुळेच पडळकरांनी असे विधान केले आहे. त्यामुळे पडळकर यांनी जाहीर माफी मागावी. शिवाय भविष्यात असे बेताल वक्तव्य केल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांना माफ करणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.