लातूर- नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रीय मराठा पक्षाला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यात आरक्षण आणि अॅट्रॉसिटी या २ प्रमुख मुद्यावर आगामी विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आरक्षण अन् अॅट्रॉसिटीच्या मुद्यावर राष्ट्रीय मराठा पार्टी लढविणार विधानसभा निवडणूक
भाजप सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी याचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टी समोर येत आहे.
जातीच्या आधारावर सवलती न देता आर्थिक निकष लावून सवलत दिल्याने खऱ्या अर्थाने आरक्षणाचा लाभ होणार आहे. जातीच्या आधारावर आरक्षण दिले जात असल्याने समाजातील अनेक घटकांवर याचा परिणाम होत आहे. शिवाय अॅट्रॉसिटीचाही गैरवापर दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कायदा रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याचे अंकुशराव पाटील यांनी सांगितले. आगामी काळातील निवडणुका पाहता या पार्टीच्या वतीने दुष्काळ पाहणी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्यानुषंगानेच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दत्ताजीराव देसाई, अनिकेत जाधव, सूर्यकांत सह्याद्री महाराज, बालाजी गोडसे, विजय कोयले, रामभाऊ बिराजदार यांची उपस्थिती होती.
भाजप सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी याचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टी समोर येत आहे. आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाच वेगवेगळ्या योजना आणि सोयीसुविधा यापासून वंचित आहे. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीकडूनच या समाजावर अन्याय झाला आहे. आता लढण्याची वेळ येऊन ठेपली असून या निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टी आपले अस्तित्व दाखवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने 288 जागांवर उमेदवार देण्यात येणार असून आतापासूनच कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अंकुशराव पाटील यांनी वंचित बहुजन आघडीवरी सडकून टीका केली. पक्षाचे उमेदवार हे कोण्या एका जातीचे नसून सर्वसमावेशक असल्याचेही त्यांनी सांगितले.