लातूर - राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने चार दिवसांपूर्वी शहरात येऊन दोघांंना ताब्यात घेतले असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, संतोष शेल्हाळ व आनंद यादव नावाच्या दोन व्यक्तींना एनआयएने चार-पाच दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. हे दोनही व्यक्ती जिल्ह्यातील रहिवासी नाहीत. त्यांना का ताब्यात घेण्यात आले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने लातूरमधून दोघांना घेतले ताब्यात, कारण अद्याप गुलदस्त्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने चार दिवसांपूर्वी शहरात येऊन दोघांंना ताब्यात घेतले असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, संतोष शेल्हाळ व आनंद यादव नावाच्या दोन व्यक्तींना एनआयएने चार-पाच दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. हे दोनही व्यक्ती जिल्ह्यातील रहिवासी नाहीत. त्यांना का ताब्यात घेण्यात आले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सध्या मुंबईतील बहुचर्चित सचिन वाझे प्रकरणाचा तपास करत आहे. हा तपास सुरू असताना 'एनआयए'ने लातूरमध्ये येऊन संतोष शेल्हाळ व आनंद यादव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. या वृत्ताला जिल्हा पोलीस प्रशासनानेही दुजोरा दिला आहे. दरम्यान याचे सचिन वाझे प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
हेही वाचा -ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या नावावर भुजबळांची राजकीय नौटंकी- चंद्रशेखर बावनकुळे