निलंगा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संपूर्ण देशाच्या हितासाठी समस्त मुस्लिम समाजाने यावर्षी रमजान ईद साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात जे वेळेनुसार मार्केट उघडे आहेत ते फक्त रमजान ईदसाठी उघडत असतील तर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने स्वखुशीने ते मार्केट बंद करण्यास आमची परवानगी आहे. तसेच आम्ही यावर्षीच्या ईदला गोरगरीब जनतेला होईल तशी मदत करून साजरी करणार असल्याचा मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे.
निलंग्यात यंदा ईदचा सार्वजनिक उत्सव नाही; घरात राहूनच साजरा होणार सण - latur ramzan eid
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संपूर्ण देशाच्या हितासाठी समस्त मुस्लिम समाजाने यावर्षी रमझान ईद साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात जे वेळेनुसार मार्केट उघडे आहेत ते फक्त रमजान ईदसाठी उघडत असतील तर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने स्वखुशीने ते मार्केट बंद करण्यास आमची परवानगी आहे.
निलंग्यात यंदा ईदचा सार्वजनिक उत्सव नाही, घरात राहूनच साजरा होणार सण
सोबतच शहरातील सर्व मस्जिदीवरील लाऊडस्पीकरवर कोरोना विषाणूचा प्रादुभाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी व सूचना देण्यासाठी परवानगी देण्यात यावी. ज्यामुळे जनतेमध्ये योग्य जागरूकता निर्माण होऊन कोरोनाच्या वाढत्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. अशा मागणीचे निवेदन समस्त निलंगा मुस्लीम समाजाच्या वतीने देण्यात आले.