लातूर- दारू पिण्यासाठी एका बिअर बारमध्ये बसलेल्या मित्रांमध्ये भांडण झाले. यात एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
औसा शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका बिअर बारमध्ये शुक्रवारी (दि. 6 मार्च) रात्री 11 वाजता हे दोघे दारू पित होते. दारू पिण्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला. त्यानंतर बारच्या बाहेर वादातून दिनेश मच्छिंद्र बनसोडे या तरुणावर टिंग्या नामक २२ वर्षीय तरुणाने कोयत्याने हल्ला केला. घटनेनंतर टिंग्या घटनास्थळावरून फरार झाला.