लातूर - संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य अधिकारी, पोलीस यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर लढतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीसदेखील रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी गुरुवारी मास्क, सॅनिटाईजर आणि हॅन्डग्लोव्जचे वाटप केले आहे.
खासदार सुधाकर शृंगारे यांनी पोलिसांना मास्क, सॅनिटाइजर आणि हॅन्डग्लोव्जचे केले वाटप
पोलिसांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी गुरुवारी मास्क, सॅनिटाईजर आणि हॅन्डग्लोव्जचे वाटप केले आहे.
पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावल्याने अद्यापही लष्करांना पाचारण करावे लागलेले नाही. मात्र, त्यांचे कार्य जनतेच्या सेवेसाठी असतानाही अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. ही बाब दुर्दैवी असून सरकारने अशा समाज कंटाकविरोधत कडक पाऊले उचलली आहेत. सध्या मे महिन्यातील रखरखत्या उन्हाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस आणि आरोग्य कर्मचारी हे देशसेवा करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. आज या कोरोनाच्या लढाईत अनेक हजारहून अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोना बाधित झाले आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे जनतेची सुरक्षा करीत असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून या सुरक्षात्मक किट चे वाटप करण्यात आल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.
वाहतूक शाखेच्या विभागात सॅनिटाईजर, मास्क, हॅन्डग्लोव्जचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, विभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, भाजपाचे शहर अध्यक्ष रघुनाथ मगे यांची उपस्थिती होती. लातूर शहराबरोबरच तालुक्याच्या ठिकाणीही या किटचे वाटप केले जाणार असल्याचे खासदार शृंगारे यांनी सांगितले.