महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नियमानुसार पीककर्ज वाटप करा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे' - नियमानुसार पीककर्ज देण्याची खासदार निंबाळकर यांची तंबी

सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे. टारगेट प्रमाणे पीककर्ज वाटप होत नसेल, तर गाठ माझ्याशी आहे. कामात कसूर करणाऱ्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करू, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला.

omraje
बैठकीत सूचना करताना खासदार ओमराजे निंबाळकर

By

Published : Jul 3, 2020, 7:40 PM IST

Updated : Jul 3, 2020, 9:05 PM IST

लातूर- बँकांनी शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज द्यावे. टारगेट प्रमाणे पीककर्ज वाटप होत नसेल, तर गाठ माझ्याशी आहे. कामात कसूर करणाऱ्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करू, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बँकाना दिला.

निलंगा पंचायत समिती येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज निलंगा तालुक्यातील १६८ गावातील शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज वाटप करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

'नियमानुसार पीककर्ज वाटप करा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे'

फालतू कागदपत्र शेतकऱ्यांना मागून त्यांचा अपमान करू नका. शक्य तेवढे लवकर आणि सुलभ पीककर्ज द्या. त्यांच्या हक्काची बँक आहे. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर बँकांनी पीककर्ज वाटप केलेच पाहिजे. अनेक बँका तुमचे गाव आमच्या बँकेला दत्तक नाही, म्हणून वापस पाठवतात. दत्तक बँक कोणत्याही घटनेत तरतूद नाही. बँक क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाचा लाभ घेता येतो. कर्ज मागणी करायला आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या, बे बाकी प्रमाणपत्र आता मागू नका, ते ऑनलाईन झाले आहे, अशाही सूचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी उपस्थित बँक व्यवस्थापकांना केल्या.

यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. त्यांनी तक्रारी बोलून दाखवल्या. कर्जासाठी कोणतीही बँक आम्हाला दारात उभे ठाकू देत नाहीत, असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, चेअरमन दगडू सोळुंके, माजी सभापती अजित माने, सुरेश बिरादार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते उपस्थित होते.

यावेळी ननंद येथील उपस्थित शेतकरी अण्णासाहेब मिरगाळे यांनी कोणत्याही बँका शेतीवर व्यापार करण्यासाठी कर्ज देत नाहीत अशी तक्रार खासदाराला केली. यावेळी सात बाऱ्यावर बोजा टाकून देता येते, त्यामुळे कर्ज द्या, अशा सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना केल्या.

Last Updated : Jul 3, 2020, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details