महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2022, 5:13 PM IST

ETV Bharat / state

Snake Bite Man : लातूरमधील व्यक्तीला 500 पेक्षा जास्त वेळा सर्पदंश; डॉक्टरही हैराण

लातूर जिल्ह्यातील औसा शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सापाने तब्बल 500 पेक्षा जास्तवेळा दंश केला असल्याचे समोर आले आहे. ( 500 times snake bite man ) विशेष आश्चर्य म्हणजे गर्दीत सुद्धा याच व्यक्तीला साप चावतो. यामुळे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

more than 500 times snake bite a man in ausa latur
लातूरमधील व्यक्तीला 500 पेक्षा जास्त वेळा सर्पदंश

लातूर - जिल्ह्यातील औसा शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सापाने तब्बल 500 पेक्षा जास्तवेळा दंश केला असल्याचे समोर आले आहे. ( 500 times snake bite man ) विशेष आश्चर्य म्हणजे गर्दीत सुद्धा याच व्यक्तीला साप चावतो. यामुळे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत डॉक्टर आणि रुग्णाची प्रतिक्रिया

लोकांना नाही पण त्यांनाच साप चावून जात असल्याचा दावा -

लातुर जिल्ह्यातील औसा शहरातील संजयनगर भागात राहणारे अनिल तुकाराम गायकवाड (वय 45) हे शेतमजूर आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेकांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम केले आहे. शेतात काम करत असताना सापाने अनेकदा त्यांचा चावा घेतला आहे. शहरातही अनेक माणसांच्या गर्दीत, कार्यक्रमात असताना लोकांना नाही पण त्यांनाच साप चावून जात असल्याचा दावा अनिल गायकवाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 10-15 वर्षाच्या काळात किमान 500 वेळा सापाने त्यांना दंश केला आहे. अनेकदा प्रकृती खालावली की त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं आहे.

हेही वाचा -Supriya Sule on alliance with AIMIM : एमआयएमसोबत युती होणार का? सुप्रिया सुळेंनी दिले स्पष्ट उत्तर

अनिल गायकवाड यांच्यावर उपचार करणारे डॉ. सच्चिदानंद रणदिवे म्हणाले की, "स्वतः गायकवाड यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की, इतरांना नाही पण गर्दीत असतानाही त्यांनाच साप का चावतो? मी त्यांच्यावर किमान 150 पेक्षा जास्त वेळा उपचार केले आहेत." डॉ. रणदिवे यांनी लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी केली आहे. सध्या औसा येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून मागील पाच वर्षांपासून कर्तव्यावर आहेत. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी अनिल गायकवाड यांच्यावर किमान 150 पेक्षा वेळा उपचार केले असून गर्दी असतानाही साप त्यांनाच का चावतो? इतरांना चावत नाही. याचे आश्चर्य तर आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details