लातूर - दीड महिन्यानंतर लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणत काही उद्योग- व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. मार्केट सुरू होऊनदेखील मोबाईल दुकानदार ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत. ग्राहकांची गर्दी आहे पण मोबाईलसह इतर मालाचा पुरवठाच नसल्याने दुकानदार हताश आहेत.
कोरोना साईड इफेक्ट : मोबाईल मागणीत वाढ; पुरवठ्यात घट - लातूर कोरोना
दीड महिन्याचा लॉकडाऊन आणि सद्यस्थितीलाही आयात-निर्यात बंद असल्याने सर्व काही ठप्प आहे, तर दुसरीकडे मोबाईल खरेदी आणि दुरुस्तीसाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.
मोबाईलसह दुरुस्तीच्या साहित्याचा पुरवठा हा चीनमधून केला जातो. पण गेल्या दीड महिन्याचा लॉकडाऊन आणि सद्यस्थितीलाही आयात-निर्यात बंद असल्याने सर्व काही ठप्प आहे, तर दुसरीकडे मोबाईल खरेदी आणि दुरुस्तीसाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. पण पुरवठाच नसल्याने आहे त्या मोबाईलवर समाधान मानावे लागत आहे. ग्राहकांबरोबर आता कोचिंग क्लासेसही ऑनलाईनद्वारे सुरू असल्याने टॅबची मागणी वाढली आहे. आतापर्यंत विविध पद्धतीचे मोबाईल बाजारात दाखल होत होते पण ग्राहकांच्या प्रतीक्षेत दुकानदार आहेत. लॉकडाऊनच्या प्रतिकूल परिस्थितीनंतरही मोबाईल दुकानात गर्दी आहे. पण ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे विक्रेते नरेश मोटवाणी यांनी सांगितले.
शिवाय 1 एप्रिलपासून जीएसटीमध्येही 6 टक्क्यांची वाढ झाली आहे असून याची झळही ग्राहकांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे नवीन माल बाजारात दाखल होईपर्यंत या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन आणि आयात- निर्यात बंद असल्याचा परिणाम आता मार्केट सुरू झाल्यानंतरही जाणवू लागला आहे.