लातूर - सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन मनसेच्यावतीने आतापर्यंत आंदोलने करण्यात आली आहेत. लातूर- नांदेड या महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे. तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यास चक्क खड्ड्यात बसवून ठेवले तर पदाधिकाऱ्यांनी 'झोपा काढो' आंदोलन केले.
लातूर-नांदेड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. गेल्या दिवसांपासून साधी डागडुजी देखील झालेली नाही. यातच सततच्या पावसामुळे वाहने मार्गस्थ होण्यास अडचणी येत आहेत तर अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. यापूर्वीही मनसेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनादरम्यान अभियंत्यासच बसवून ठेवण्यात आले तर मोठ्या खड्यांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी झोपा काढल्या.