निलंगा (लातूर)- सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत अनेक जण महत्वपूर्ण योगदान देत आहेत. जीवाची काळजी न करता आहोरात्र सेवा देणाऱ्या निलंगा शहरातील डॉक्टरांना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पीपीई किट, एन ९५ मास्क,गॉगल, सॅनिटायझर साहित्याचे वाटप केले.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून शहरातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप - latur
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईतील डॉक्टरांच्या योगदानाबद्दल शुभेच्छा देत सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. सर्वानी स्वतःची ही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईतील डॉक्टरांच्या योगदानाबद्दल शुभेच्छा देत सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. सर्वानी स्वतःची ही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला दिला. यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, ,उपजिल्हाधिकारी विकास माने, ,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,नगर परीषद मुख्याधिकारी ,डाॕ.लालासाहेब देशमुख ,डाॕ.किरण बाहेती,डाॕ.रामकृष्ण पाटील वडगावकर,डाॕ.प्रमोद हतागळे आदी उपस्थित होते.
कोरोना या आजारावर मात करण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार फंडाचे १ कोटी रुपये निधी आरोग्य विभागवर खर्च करण्यास सांगितले आहे. आक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील गरजवंत कुटुंबांना किराणा मालाचे ५ हजार किट वाटप करण्यात आले आहेत.