महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित देशमुख म्हणतात सत्ताबदल होणारच...'हे' दिले कारण

नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा देण्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केले आहे. उजनीच्या पाण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. आता आश्वासन देण्याची वेळ नाही तर, प्रत्यक्षात पाणी लातूरकरांना मिळणे अपेक्षित होते. असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना टोला लगावला आहे.

सरकारविरोधातील वाढता रोष आणि बदलत असलेली मानसिकता हे सत्ता बदलाचे संकेत - अमित देशमुख

By

Published : Oct 11, 2019, 7:07 PM IST

लातूर -जनतेने भाजप-सेनेला एकहाती सत्ता दिली. मात्र, युती सरकारला ती सांभाळता आली नाही. त्यामुळे सरकारविरोधातील वाढता रोष आणि बदलत असलेली मानसिकता हे सत्ता बदलाचे संकेत असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

सरकारविरोधातील वाढता रोष आणि बदलत असलेली मानसिकता हे सत्ता बदलाचे संकेत - अमित देशमुख

दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर पोकळी निर्माण झाली आहे. असे असताना तुम्ही फक्त मतदारसंघापुरतेच मर्यादित आहात. यावर बोलताना आमित देशमुख म्हणाले की, पक्षाने नेमून दिलेल्या क्षेत्रात काम करावे लागते. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार विजयी झाले की यातून अमित देशमुख यांचे कार्य समोर येईल, असा विश्वास अमित देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा -लक्षवेधी औसा मतदारसंघात अमित शाहांची सभा; पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करण्याचे आव्हान

विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरावर आहे. असे असताना अमित देशमुख हे हट्रिक साधणार का? काय आहेत त्यांच्या समोरील आव्हाने? लातूरकरांचे प्रश्न कायमच कसे? अशा एक ना अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला. नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा देण्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केले आहे. उजनीच्या पाण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. आता आश्वासन देण्याची वेळ नाही तर प्रत्यक्षात पाणी लातूरकरांना मिळणे अपेक्षित होते. असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना टोला लगावला आहे. बेरोजगारी, महागाई, पीकविमा यासारख्या मुलभूत समस्या कायम असल्याने यावेळी परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात

दरम्यान, केवळ जिल्ह्यातच नाहीतर राज्यभर सरकरबाबद्दल रोष आहे. जनता ती 21 तारखेला मतदानातून व्यक्त करेल. मात्र, आश्वासनापूरतेच हे सरकार मर्यादित असल्याचे जनतेने ओळखले आहे. लातूरकरांना विकास कोणाच्या माध्यमातून होणार हे माहीत आहे. यावेळी हट्रिक होणार असा विश्वासही ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details