लातूर - लोकसभा निवडणूक ही गल्लीची नव्हे तर दिल्लीची सांगणारे मुख्यमंत्री यांनी औसा येथील सभेत पातळी सोडून राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. अशा टीकेमुळेच राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, राज्यस्थान ही राज्ये जिंकली. त्यामुळे तुम्ही अशीच टीका करा, राहुल गांधी हे देश जिंकतील, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
तुम्ही वैयक्तिक टीका करा, ते देश जिंकतील - अमित देशमुख - latur loksabha
अशा टीकेमुळेच राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, राज्यस्थान ही राज्ये जिंकली.
मंगळवारी लातूर येथे महाघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या घरण्यावर टीका केली होती. याचा खरपूस समाचार देशमुख यांनी घेतला. विकासाचे मुद्दे बाजूला ठेऊन देशहिताचे राजकारण केले जात आहे. राज्यात दुष्काळाने जनता अस्वस्थ आहे. जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे. विकासाचे आश्वासन नको तर मूलभूत सॊई-सुविधा पुरविण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नव्हे तर भाजप जुमला पार्टी नाव हे अधिक शोभते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजपचे संकल्प पत्र हे जनतेसाठी संकटपत्र आहे. हे संकटपत्र दूर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, अशोक पाटील निलंगेकर, दिलीपराव देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह मनपाचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.