लातूर -ईटीव्ही भारतने कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये असलेले समज आणि गैरसमज जाणून घेण्यासाठी लातूरच्या हरंगुळ (खुर्द) येथे ग्रामस्थांसोबत चर्चा केली आहे. कोरोना विषाणू काय आहे, त्याबद्दल घ्यावयाची काळजी इथपर्यंतची माहिती या ग्रामीण भागातील जनतेलाही झाली आहे. मात्र, कोणाला कोरोनाची लागण झाली की त्यातून सुटका नाही, हा गैरसमज ग्रामस्थांमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाची जनजागृती मोहीम आणि प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल काय आहे, यासंबंधी हरंगूळ (खुर्द) येथे घेतलेला हा आढावा...
हेही वाचा...VIDEO : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. विशेष मुलाखत - भाग ३
सुदैवाने लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार आशा सेविका, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, लोकप्रतिनिधीही घराघरात जाऊन जनजागृती करत आहेत. मात्र, ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल नेमके काय आहे, याचा ठाव घेतला असता अनेक बाबी समोर आल्या आहेत.