लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये राजकिय नेत्यांचाही समावेश आहे. रविवारी राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण; मुंबईत उपचार सुरू
दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना ताप, सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत आमदार अभिमन्यू पवार, माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी आमदार अभिमन्यू पवार आणि रामचंद्र तिरुके यांनी कोरोनावर मात केली आहे. तर, माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्यावर मपुणे येथे उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री बनसोडे यांना ताप, सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री बनसोडे हे उदगीर मतदारसंघात कोरोना बाबतचा आढावा घेत होते. शिवाय जागोजागी जाऊन त्यांनी जनजागृतीही केली होती. त्यामुळे अनेकांच्या संपर्कात आले असून संबंधितांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. रविवारी त्यांचा अहवाल आला असून ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत हजर राहील, असेही त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.