लातूर -सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना लोदगा गावचे सुपुत्र गणपत सुरेश लांडगे यांना वीरमरण आले. सहा दिवसानंतर लोदगा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचे संरक्षण करत असताना गणपत यांना वीरमरण आल्याचा अभिमान त्यांच्या कुटुंबियांना असला तरी घरचा कर्ता पुरूष गेल्याचे दुःखही आहे.
हुतात्मा गणपत लांडगे अनंतात विलीन; लोदगा गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - हुतात्मा गणपत लांडगे अंत्यसंस्कार
बुधवारी सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना गणपत सुरेश लांडगे यांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने त्यांचे निधन झाले. प्रतिकूल वातावरण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे त्यांचे पार्थिव मूळ गावी येण्यास विलंब झाला. अखेर शनिवारी मध्यरात्री गणपत लांडगे यांचे पार्थिव गावात दाखल झाले. आज सकाळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
![हुतात्मा गणपत लांडगे अनंतात विलीन; लोदगा गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Funeral](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7136667-230-7136667-1589086892142.jpg)
2013 मध्ये गणपत लांडगे हे सैन्य दलाच्या मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. बुधवारी सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने त्यांचे निधन झाले होते. प्रतिकूल वातावरण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे त्यांचे पार्थिव मूळ गावी येण्यास विलंब झाला. अखेर शनिवारी मध्यरात्री गणपत लांडगे यांचे पार्थिव गावात दाखल झाले. आज सकाळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोदगा पंचक्रोशीतील ते पहिले जवान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. गेल्या 5 दिवसांपासून घरच्यांसह गावकऱ्यांना त्यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने हे उपस्थित होते.