महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्राने होणार मूल...? विवाहितेला फसवून भोंदूबाबाचा बलात्कार - maharashtra

लग्नाला ४ वर्ष उलटूनही मूल होत नसल्याने बोरी (ता. लातूर) येथील भोंदूबाबाबीषयी त्यांना माहिती मिळाली. यातूनच मोहमद पाशा शेख हा त्यांच्या संपर्कात आला.

विवाहितेला फसवूण भोंदू बाबाचा बलात्कार

By

Published : May 4, 2019, 2:25 PM IST

लातूर - पुरोगामी महाराष्ट्रात आजही जादूटोणा, जात पंचायत यासारखे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार लातुरात समोर आला आहे. मंत्र-तंत्राने संतती प्राप्त करून देतो म्हणून सांगत एका विवाहितेवर भोंदूबाबाने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने विवेकानंद पोलीस ठाण्यात भोंदूबाबाच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.

विवाहितेला फसवूण भोंदू बाबाचा बलात्कार

शहरातील पश्चिमनगर भागात एका २५ वर्षीय महिला पतीसह राहत होती. लग्नाला ४ वर्ष उलटूनही मूल होत नसल्याने बोरी (ता. लातूर) येथील भोंदूबाबाबीषयी त्यांना माहिती मिळाली. यातूनच मोहमद पाशा शेख हा त्यांच्या संपर्कात आला. मुलाचे आमिष दाखविल्याने त्या महिलेनेही मोहम्मद शेख याकडे जा-ये वाढली. मुलासाठी व्याकुळ असलेल्या महिलेचा गैरफायदा घेत त्याने बिदर, लातूर ठिकाणी घेऊन जात अनेक दिवसांपासून बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच या महिलेची भोंदूबाबाच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली होती. यानुसार बलात्कार, जादूटोणाविरोधी कायदा व अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा भोंदूबाबावर कडक कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details