महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुनश्च लॉकडाऊन... केवळ १२ जणांच्या उपस्थितीतच उरकला लग्नसोहळा - लातूर कोरोना अपडेट

कोरोना हळूहळू जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरत असल्याने लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन जिल्ह्यात पुन्हा १५ दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कडक नियमावली जाहीर करण्यात आली असून आता ५० नागरिकांनाही लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. या नियमांमुळेच उदगीरमधील बसवेश्वर डावळे आणि अश्विनी हाळे या जोडीने १२ व्यक्तींच्या उपस्थितीत घरातच लग्नसोहळा उरकून घेतला.

Basweshwar and Ashwini
बसवेश्वर आणि अश्विनी

By

Published : Jul 17, 2020, 11:54 AM IST

लातूर -लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात ५० जणांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र, लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याबाबत कडक नियमावली जाहीर करण्यात आली असून आता ५० नागरिकांनाही लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. या नियमांमुळेच उदगीरमधील बसवेश्वर डावळे आणि अश्विनी हाळे या जोडीने १२ व्यक्तींच्या उपस्थितीत घरातच लग्नसोहळा उरकून घेतला.

केवळ १२ जणांच्या उपस्थितीत उरकला लग्नसोहळा

सामान्यपणे लग्न म्हणले की, नातेवाईकांची रेलचेल, वऱ्हाडी मंडळीचा गोंधळ आणि मित्र परिवाराचे नाचगाणे असे काहीसे चित्र असते. मात्र, कोरोनामुळे या सोहळ्याची व्याख्याच बदलली आहे. आत्तापर्यंत लॉकडाऊनमुळे अनेकांनी नियमांचे पालन करत ५० जणांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळे करून घेतले. लातूरमध्ये १५ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊनची कडक अंमवबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लग्नाबाबतचा नियमही बदलला. ज्या दिवशी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाले त्याच दिवशी बसवेश्वर डावळे आणि अश्विनी हाळे यांचा विवाह होता. मात्र, नव्या नियमावलीनुसार त्यांच्या लग्नाला ५० जणांची उपस्थितीही नाकारण्यात आली. त्यामुळे केवळ मुलीचे आणि मुलाचे नातेवाईक आणि भटजींच्या उपस्थितीत घरामध्येच हा विवाह सोहळा पार पडला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे, अशा प्रकारची कडक नियमावली जारी केली जात आहे. नागरिकही याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करताना दिसत आहेत. सुरुवातीला शहरातच असणारा कोरोना हळूहळू जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरत असल्याने लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन जिल्ह्यात पुन्हा १५ दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details