महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2019, 8:33 PM IST

ETV Bharat / state

इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका; अहमदपूर परीक्षा केंद्रावर गोंधळ

अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या केंद्रावर सोमवारी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने १ तास गोंधळ उडाला होता.

महात्मा फुले विद्यालय

लातूर- दहावी बोर्ड परीक्षेच्या गणित भाग-१ विषयाच्या परीक्षेचे गणितच बिघडल्याने एकच गोंधळ उडाला. अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या केंद्रावर सोमवारी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने १ तास गोंधळ उडाला होता. अखेर बोर्डाकडून प्रश्नपत्रिका आल्यानंतर २ तास उशिराने गणिताचा पेपर सुरू झाला.

अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या केंद्रावर इयत्ता १० वीच्या परीक्षा सुरू आहेत. मराठी माध्यमाचे २८९, इंग्रजी माध्यमांचे २९३ तर उर्दू माध्यमांचे २२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. मात्र, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका लिफाप्यातच निघाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह केंद्रावरील परीक्षक गोंधाळलेल्या अवस्थेत होते.

महात्मा फुले विद्यालय

मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. परंतु प्रश्नपत्रिकांच्या पाकिटावर इंग्रजी माध्यम असे लिहिले असतानाही ३०० प्रश्नपत्रिका या मराठी माध्यमाच्या निघाल्या होत्या. हा प्रकार परिक्षकांनी केंद्र संचालक एस. आर. जाधव यांच्यामार्फत बोर्डाला कळिवला. त्यानंतर लातूर विभागीय कार्यालयातून गणित भाग १ विषयाच्या इंग्रजी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आल्या. त्यानंतर दुपारी १ च्या दरम्यान इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि ३ वाजता परीक्षा संपली.

ABOUT THE AUTHOR

...view details