महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईडी'च्या नोटीसला विरोध म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' - माणिक जाधव - latur news

शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशावरून केली असून, याला राजकीय रंग दिला जात आहे. तसेच यामध्ये शरद पवार हेच मुख्य आरोपी असल्याचा आरोप निलंग्याचे याचिकाकर्ते व माजी आमदार माणिक जाधव यांनी केला.

याचिकाकर्ते माणिक जाधव

By

Published : Sep 26, 2019, 10:53 AM IST

लातूर - शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशावरून केली असून, याला राजकीय रंग दिला जात आहे. तसेच यामध्ये शरद पवार हेच मुख्य आरोपी असल्याचा आरोप याचिकाकर्ते निलंग्याचे माजी आमदार माणिक जाधव यांनी केला.

याचिकाकर्ते माणिक जाधव

राज्य सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या 77 संचालकांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर जागोजागी या कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

हेही वाचा शरद पवारांवर गुन्हा : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुवारी परभणी बंदचे आवाहन

विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सत्ताधाऱ्यांनी हा डाव केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र, 25 वर्षांपूर्वी 50 लाख शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माणिक जाधव यांनी याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात होते.

हेही वाचा 'चोर तो चोर वर शिरजोर', बारामती बंदवरुन दमानियांचा पवारांना टोला

संचालक, सभापती नसल्याचे शरद पवारांकडून सांगितले जात असले, तरीही तेच पडद्यामागचे सूत्रधार होते, असे माणिक जाधव यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने त्यांना 120 (ब) 109 अंतर्गत दोषी असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला आता वाचा फुटली असून, 50 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा आशावाद माणिक जाधव यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details