लातूर - आपली पत्नी व मुले सोडून माहेरी राहत असल्याने दारूचे व्यसन जडलेल्या व्यक्तीचा नदीच्या पात्रात मृत्याची झाल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावात गेल्या चार दिवसांपासून गावातील ज्ञानोबा धोंडीबा शिंदे (वय-42) हा ट्रॅक्टरवर मजूरी करणारा व्यक्ती गायब होता. पत्नी माहेरी गेल्याच्या विरहातून मानसिकरीत्या खचलेल्या या व्यक्तीचा दारूच्या नशेतच मृत्यू झाला.
हेही वाचा - धक्कादायक..! शिवसेना पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर कारमध्ये बलात्कार
7 फेबृवारी रोजी नदी पात्रात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले व पोलिसांना फोन करून माहिती दिली. लोकांच्या सहाय्याने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मात्र, मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे शेवटी बीट जमादार चंद्रहंस गौंडगावे यांनी अंतर्वस्त्रावरून व्यक्तीचा शोध लावला आणि ओळख पटली.
अनेक दिवसापासून शिंदे यांच्या पत्नी दारू जास्त पिऊन त्रास देत असल्याने ती आपल्या दोन मुलांसह माहेरी राहते त्यातच पत्नी आणि मुलांचा विरह सहन होत नसल्याने तो जास्तच दारूच्या आहरी गेला व आपला जीव गमावून बसल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत औराद शा. पोलिस पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई चंद्रहास गौंडगावे यांनी पंचनामा करून शेवविच्छेदनासाठी हलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले आहे.
हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण : उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू