लातूर- महाराष्ट्र राज्याच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त बाभूळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर येणार असल्याच्या सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, ऐन वेळी ते अनुउपस्थित राहिल्याने कार्यक्रम ठिकाणी एकच चर्चा सुरू झाली. कौटुंबिक कारणामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचे समोर येत आहे. जिल्हाअधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडले.
लातुरात पालकमंत्र्यांच्या अनुउपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून ध्वजारोहण - संभाजी पाटील निलंगेकर
पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ च्या दरम्यान मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अनुउपस्थितीमध्ये ध्वजारोहण पार पडले.
येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ च्या दरम्यान मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास पालकमंत्री तथा कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे उपस्थित राहणार असल्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने तयारीही करण्यात आली होती. मात्र, ऐन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात स्वीयसहाय्यक जोशी यांच्याशी संपर्क केला असता, कौटुंबिक अडचणीमुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमास मनपा आयुक्त एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर पोलीस अधिक्षक राजेद्र माने, अप्पर जिल्हा अधिकारी अविनाश पाठक, जि.प. अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाअधिकारी यांनी देशाच्या प्रगतीमध्ये वाटा उचलणाऱ्या कामगारांना तसेच उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. तब्बल २३० जवानांनी यामध्ये सहभाग नोंदिवला होता. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते महसूल, क्रिडा व पोलीस विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.