मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. ५० हून अधिक आमदार शिंदे यांच्या गोटात सामील झाले. महाविकास आघाडी सरकार यामुळे अल्पमतात आले. बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अखेर बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेश न जुमानता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बंडखोर आमदारांना ११ जुलै पर्यंत दिलासा दिला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावले. शिवसेनेने या विरोधात याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र न्यायालयाने शिवसेनेचे याचिका फेटाळून लावली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपने त्यानंतर एकच जयघोष केला. तसेच, उद्या सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापणेचा दावा केला असून 1 जुलै रोजी शपथविधी घेणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
Maharashtra Political Crisis : भाजप करणार सत्तास्थापनेचा दावा - एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1 जुलैला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) सरकारचा शपथविधी होऊ शकतो. भाजप नेते देवेंद्र फडणवीस उद्या सत्तास्थापनेचा दावा ( BJP will claim power ) राज्यपालांकडे केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप करणार सत्तास्थापनेचा दावा