महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा पोलीस दलात नव्या 51 दुचाकी आणि 28 चारचाकी दाखल - लातूर पोलीस

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात केवळ पालकमंत्र्यांच्या हस्ते एकच मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत जिल्हा पोलीस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले.

Latur police
Latur police

By

Published : May 1, 2021, 5:44 PM IST

लातूर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. याावेळी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत जिल्हा पोलीस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात केवळ पालकमंत्र्यांच्या हस्ते एकच मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत जिल्हा पोलीस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगर पालिका आयुक्त अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details