महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिशन विधानसभा : मुख्यमंत्री दोन दिवसात पाच विधानसभा मतदारसंघांना देणार भेट

विधानसभा निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दाखल होत आहे. 2 दिवसांच्या या यात्रेत मुख्यमंत्री हे 6 पैकी 5 विधानसभा मतदार संघांना भेट देणार आहेत.

मिशन विधानसभा

By

Published : Aug 31, 2019, 12:33 AM IST

लातूर -विधानसभा निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दाखल होत आहे. 2 दिवसांच्या या यात्रेत मुख्यमंत्री हे 6 पैकी 5 विधानसभा मतदार संघांना भेट देणार आहेत. त्यामुळे सर्वच मतदार संघात जय्यत तयारी करण्यात आली असून उद्या शनिवारी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांना ग्रीन सिग्नल मिळतो की वेटिंगवर थांबावे लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिशन विधानसभा


जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. शिवाय गेल्या 5 वर्षात या काँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपने घुसखोरी केली असून स्थानिक स्वराज्य संस्थापसून विविध निवडणुकांत यश मिळविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून ही महाजनादेश यात्रा महत्वाची ठरणार आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यातून काँग्रेसमधून कुणाचे आउटगोइंग झालेले नाही. मात्र, शनिवारी काय होईल हे पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे. शनिवारी दुपारी अहमदपूर, उदगीर येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर शहरात दाखल होत आहेत. लातूर शहर विधानसभेची जागा भाजपच्या दृष्टीने महत्वाची असून या ठिकाणी आ. अमित देशमुख यांचे आव्हान समोर आहे. त्यामुळे मुक्कामी असलेले मुख्यमंत्री या करिता कोणती वेगळी पद्धती अवलंबतात की काय अशी चर्चाही रंगू लागली आहे.


जाहीर सभा, गावाच्या ठिकाणी स्वागत तसेच पत्रकार परिषद आदी कार्यक्रम त्यांच्या दौऱ्यात आहेत. त्यामुळेच संबंध जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी कामाला लागली असून सुरक्षतेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनही कामाला लागले आहे. शिवाय रस्त्यांची दुरुस्ती आणि शहरात सुरू असलेले आंदोलनेही स्थगित करण्यात आलेली आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात पक्षातील अंतर्गत मतभेद, जागा वाटपतील निर्णय यासारख्या महत्वाच्या गोष्टींची खलबते होणार हे नक्की. पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडत आहे. अहमदपूर आणि औसा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी अधिक असून या ठिकाणी काय तोडगा निघणार यावरून विधानसभेच्या उमेदवारी बाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी सुरू असून राजकीय नेत्यांबरोबर प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details