लातूर - राजकारणात भरती-ओहोटी येतच असते. मात्र, गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारबद्दल असंतोषाचे वातावरण असून आता भरती आली असल्याने काँग्रेसचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आपण काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवू, असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार मच्छिद्र कामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
लाट ओसरली, काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवणार - मच्छिद्र कामंत - congress
गेल्या ५ वर्षात सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. पुन्हा लातूरला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे.
विकास या एका मुद्द्यावरच लातूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर गेल्या ५ वर्षातील सत्तातरानंतर पदरी काय पडले हे संबंध जिल्ह्याला माहित आहे. यातच विरोधकांनी इतर सक्षम उमेदवारांना डावलून दिलेली उमेदवारी हा चर्चेचा विषय असल्याचे सांगत कामंत यांनी उमेदवारीसाठी अर्थार्जन झाले असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यामुळे जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक होणार आहे. मात्र, मतदार हा जागृत असून यंदा परिवर्तन निश्चित असल्याचे ते म्हणाले.
गेल्या ५ वर्षात सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. पुन्हा लातूरला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. उर्वरित काळात लातूर मतदार संघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा घेण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या १० वर्षापासून सक्रिय आहे. त्यामुळे मतदार संघाबाहेर असल्याचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रचार यंत्रणा गतिमान झाली असून आपणच आघाडीवर असल्याने मतदार राजा कौल देईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.