महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेशंटकडे बघायचे की इंजेक्शनसाठी भटकंती करायची? - Latur Ramdesivir News

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होताना पाहवयास मिळत आहे. दिवसाकाठी एक ते दीड हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. तर 5 ते 6 जणांचा मृत्यू होत आहे. रुग्णांवर सुरळीत उपचार करण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक जीवाचे रान करीत आहेत. मात्र, आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांची तारांबळ होत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.

इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक
इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक

By

Published : Apr 11, 2021, 5:17 PM IST

लातूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दीड हजार नवे रुग्ण वाढत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. तर आता उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णाकडे लक्ष द्यावे की रेमडेसिवीर इंजेक्शनकडे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक

पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक

रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ज्याप्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणात या इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे मेडिकलच्या दारोदारी रुग्ण नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. रविवारी औरंगाबाद येथून केवळ 50 इंजेक्शनचा पुरवठा झाला होता. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने प्रत्येक मेडिकल समोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. जागोजागी रुग्ण नातेवाईकांची निराशा होत होती. रुग्णाच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे की इंजेक्शनसाठी भटकंती करावी? असा सवाल नातेवाईक विचारत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शनिवारीच आढावा बैठक घेतली होती. मात्र, रविवारीही योग्य तो तोडगा निघालेला नव्हता. लातूर शहरासह उदगीर, औसा, निलंगा या तालुक्यासह इतरत्रही रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा हा कायम आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा -अमरावतीत आठ लाखांच्या गुटख्यासह तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details