लातूर - मतदान प्रक्रियेनंतर सध्या लातूरचे राजकीय वातावरण शांत असून सर्वांच्या नजरा 23 मे च्या निकालाकडे लागल्या आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 23 मे ला सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने सकाळपासून ते सायंकाळी 6 पर्यंत उमेदवारांसह लातुरकरांची धकधक वाढणार आहे.
लोकसभा मतमोजणी; प्रशासन सज्ज, 600 कर्मचाऱयांची नियुक्ती - 23 may
बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. सध्या मतपत्रिका जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात सुरक्षेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. सध्या मतपत्रिका जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात सुरक्षेमध्ये ठेवण्यात आल्या असून मतमोजणी दिवशी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिंधी समक्ष हा सुरक्षा कक्ष उघडण्यात येणार आहे. त्यानंतर मतपत्रिकांच्या पेट्या केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह दाखल केल्या जाणार आहेत. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल तयार करण्यात आले आहेत. टपाली मतदान 4 टेबलांवर मोजले जाणार आहे. याकरिता 600 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून 16 मे रोजी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. काही गावांनी बहिष्काराची भूमिका घेतल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.