महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभेच्या महोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; मताचा टक्का वाढविण्यावर भर

रविवारी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासंबंधीचे सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून लातूरकर या महात्योहारमध्ये सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

By

Published : Mar 12, 2019, 4:48 PM IST

मी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

लातूर - जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. २ महिन्यांपासून मतदान प्रक्रिया, नव मतदारांची नोंदणी आणि मतदानासंबंधी जनजागृती केली जात आहे. रविवारी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासंबंधीचे सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून लातूरकर या महात्योहारमध्ये सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

गामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १८ लाख ६० हजार ४५ हजार एवढी आहेत. शिवाय २३ एप्रिलपर्यंत नाव मतदारांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकांसाठी जिल्ह्यात १९६३ मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंतची प्रक्रिया कशी राहणार आहे, याविषयीही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सांगितले.

ऐन उन्हाळ्यात ही निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या पत्रा शेडची सोय करण्यात येणार आहे. अपंग, दिव्यांगांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रशासन सोय करणार असून, तशी महिती अगोदर प्रशासनाकडे नमूद करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी १२३८४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिसंवेदशील केंद्रावर कॅमेऱयांची करडी नजर राहणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण केले जाणार आहे. 2 हजाराहून अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाय गरज पडल्यास अधिकचा बंदोबस्त मागविला जाणार आहे.

याशिवाय उमेदवारांना कोणत्या नियमांचे पालन करायचे याचीही माहिती यावेळी देण्यात आली. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता या माध्यमावरही सरकारची करडी नजर राहणार आहे. लोकसभा मतदार संघात जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून ७० टक्केपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त एम. डी. सिंह, जि. प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, माहिती जनसंपर्क अधिकारी सोनटक्के यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details